
कोल्हापूर: करवीर पीठाच्या पुरस्कारांचे वितरण उत्साहात पार पडले. दरम्यान, स्वामीजींच्या हस्ते एकूण दहा पुरस्कार देण्यात आले.

यामध्ये वेद शास्त्र मल्लारी विष्णू धर्माधिकारी यांच्या नावे वैदिक पुरस्कार सुशांत वासुदेव वझे, गोवा, श्रीपाद शास्त्री बंडोपंत जेरे – शास्त्री पुरस्कार मधुसुदन पेन्ना, रामटेक, नरहरबुआ कराडकर – कीर्तनकार पुरस्कार अशोक गणेश उपाध्ये, ठाणे, श्रीपाद सीताराम गोसावी – स्थानिक वैदिक पुरस्कार प्रदीप जोशी, औदुंबर, विद्याशंकर भारती स्वामी- सामाजिक गौरव – विभागून दिलीप देशमुख, बीड, श्रीमती लक्ष्मीबाई आळतेकर – महिला कीर्तनकार – वंदना दिलीप जोशी, गोवा, वेद चुडामणी रंगनाथ आळतेकर – होतकरू विद्यार्थी पुरस्कार, विश्वंभर कानशुक्ले, नांदेड, वेदव्रत जोशी, बीड व प्रमोद कुलकर्णी, परभणी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रसाद चिकसकर यांनी आभार मानले.दरम्यान, उद्या, शुक्रवारी दुपारी 12 महाप्रसाद, पालखी प्रदक्षिणा सायंकाळी 5 वाजता भक्तांच्या उपस्थितीत आयोजित केली आहे.
