शरद पवारांचे राजीनामा मागे घेण्याचे संकेत ; दोन दिवसात अंतिम निर्णय घेणारशरद पवारांचे राजीनामा मागे घेण्याचे संकेत ; दोन दिवसात अंतिम निर्णय घेणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याचे संकेत दिलेत. कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित न करता येत्या एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांनी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्राबाहेर ठिय्या मांडलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी या भावना व्यक्त केल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.कार्यकर्त्यांना काय म्हणाले शरद पवार ?शरद पवार कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले की, राजीनामा देण्यापूर्वी तुमच्याशी चर्चा केली असती, तर तुम्ही विरोध केला असता. तुमच्या भावनांचा आदर करतो. आता तुम्हा सर्वांची भावना लक्षात घेऊन येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ. हा निर्णय घेताना कार्यकर्त्यांच्या मनातली भावना दुर्लक्षित केली जाणार नाही. दोन दिवसांनंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. पवारांचे संकेत राजीनामा मागे घेण्याचे किंवा पक्षात सक्रिय राहण्याचे असल्याचे समजते.

🤙 8080365706