
कोल्हापूर – शाहूपुरीत काल दुपारच्या सुमारास एकावर अचानक चाकू हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडालीय.

करवीर तालुक्यातील केर्ली येथील बांधकाम व्यावसायिक पांडुरंग गायकवाड या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. ते माजी महापौर सुनिल कदम यांच्यासोबत बोलत बसले असताना हा हल्ला झाला आहे. आर्थिक देव-घेवीतून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीय. कदमवाडी येथील अभिजित गरड यांच्यासह अन्य दोघांनी हा हल्ला केलाय. जखमी गायकवाड यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू असून शाहूपुरी पोलीस निरीक्षक राजेश गवळी अधिक तपास करत आहे.
