
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे.
वृषभ मानपमान नाट्य घडतील. विसभोळेपणा जाणवेल. एखाद्या विपरित घटनेतून लाभ होण्याची शक्यता आहे. शासनाकडून होणारे लाभ मिळतील. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खूप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा.
मिथुन विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी व्यापाराचे क्षेत्र विस्तृत होईल. व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न राहील. भांवडाकडून सहकार्य लाभेल. काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल.
कर्क जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. प्रयत्न केल्यास चांगले यश मिळेल. अडकलेला पैसा मिळू शकेल. व्यापारात नवीन प्रस्ताव येतील. आर्थिक लाभासाठी खूप उलाढाली कराल.
सिंह आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील.
कन्या नोकरीत स्थान बदलाची उत्तम संधी आहे. बढती व प्रमोशनचे योग आहेत. आजचा दिवस सफलतापूर्वक व्यतीत कराल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य लाभेल. व्यापारात नवीन योजनाची सुरुवात होऊ शकते. जुनी येणी वसूल होतील.
तूळ कलाकारांसाठी विशेषत: उत्तम दिवस आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायिकांना नफ्यात वाढ होईल. गृहसौख्य उत्तम राहील. दिवसभर मन प्रसन्न असेल. पत्नी सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.
वृश्चिक आपणा विषयी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका.
धनु व्यापारात भागीदारीत नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल.
मकर मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते.
कुंभ धाडसी निर्णय घ्याल. आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल. शासकीय कामकाजात यश येईल. राजाश्रय लोभल. राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अंत्यत फायदेशीर ठरेल.
मीन साहसी निर्णय घ्याल. नोकरीत कामाप्रती ओढ निर्माण होईल. शासकीय योजना आमलात येतील. काही नवनवीन कल्पना सुचतील. यशस्वी व्हाल. फायदेशीर दिवस राहील. व्यापार व्यवसाय बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम दिनमान आहे.
