
दोनवडे : करवीर तालुक्यातील खुपीरे येथे पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने अवघ्या खुपीरे गावातील तरुणाई रस्त्यावर उतरली होती. डॉल्बिचा दणदणाटात निघालेल्या या मिरवणुकीत आकर्षक विद्युत रोषणाईने डोळ्याचे पारणे फेडणारी होती. मिरवणूक पहाण्यासाठीआबालवृद्धानी मुख्य मार्गावर गर्दी केली होती.
आठ ते दहा मंडळानी या मिरवणुकीत सहभाग घेतला.यामध्ये फ्रेंड्स पॉवर,फेमस ,डी मेंबर, बी. एम. बॉईज,तलाव तालीम,शॉट मेंबर, रॅश मेंबर आदी मंडळाच्या सदस्यांचा समावेश होता.कोरोणा परिस्थिती नंतर प्रथमच अशी मिरवणूक निघाली. विशेष म्हणजे या निमित्ताने सर्व तरूणायी रस्त्यावर उतरली होती अमाप उत्साह जाणवत होता.आकर्षक विदयूत रोषणाईने बरोबरच फटाक्यांची आतिषबाजी आकर्षक ठरली .पोलिसांनी चोख बदोबस्त ठेवला होता . गावातील प्राथमिक शाळेपासून सायंकाळी ही मिरवणूक सुरू झाली. पहिल्यांदाच अशी मिरवणूक पहाण्यासाठी मिळाली असे सांगण्यात आले. सर्व जाती धर्माचे लोक मिरवणुकीत सहभागी होते. रात्री उशिरा पर्यंत मिरवणुक सुरू होती.
