सांगलीत सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आगळावेगळा

सांगली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. सगळीकडे साजरा करण्यात येणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसापेक्षा महाराष्ट्रातील सांगली येथे सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आगळावेगळा साजरा करण्यात येत आहे.

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस म्हणजे सांगलीतील औंढी गावासाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाहीत. मराठी नववर्षाचे स्वागत ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात केले जाते अगदी तशाच स्वरूपात सचिन तेंडुलकरचा वाढदिवस साजरा केला जात आहे. सचिन तेंडुलकरने वयाचे अर्धशतक पूर्ण केल्यानं सांगलीत औंढी गावाने केलेलं सेलिब्रेशन एखाद्या सणापेक्षा नक्कीच कमी नाही.क्रिकेटचा देव म्हणून संपूर्ण जगभरात ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा आज 50 वा वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकरला सोशल मीडियासह विविध माध्यमातून वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या जात असतांना सांगालीतील औंढी गावात केलेले सेलिब्रेशन आगळेवेगळे आहेत. सांगली गावात घराघराला गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. गुढीला बॅट देखील लावण्यात आली आहे. गुढी हार फुलांनी सजविण्यात आली आहे. ढोल ताशांच्या गजरात सचिन तेंडुलकरचा छोटासा पुतळा तयार करून दिंडीही काढण्यात आली आहे.

🤙 8080365706