
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट तयार आहे. 15 दिवसांमध्ये सरकार कोसळणार, फक्त सही बाकी आहे असं मोठं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज उद्धव ठाकरे यांची जळगावात जाहीर सभा असून त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे विधान केलं आहे.सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचं जे काही राज्य आहे, ते पुढील 15 ते 20 दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही. प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय असं संजय राऊत म्हणाले. या सरकारचा ‘डेथ वॉरंट’ निघालेलं आहे, फक्त सही बाकी आहे असेही त्यांनी म्हंटल.
