
मुंबई : नवी मुंबईतील परिसरात स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्यात येणार आहे.यासाठी भारतीय हवामान विभागाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
स्वयंचलित हवामान केंद्र बसवल्यानंतर परिसरातील कमाल आणि किमान तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, वाऱ्याचा वेग याची माहिती मिळणार आहे. पावसाळ्याच्या आधीच लवकरात लवकर जागा ठरवत स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्यासाठी भारतीय हवामान विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जागेच्या पाहणीकरता लवकरच परिसराचे निरीक्षण केले जाणार आहे.
