
पुणे : एमपीएससी संयुक्त परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट हॅक झाले असून अनेक विद्यार्थ्यांची माहिती हॅक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’, ‘क’च्या परीक्षाचे हॉल तिकीट हॅक करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो विध्यार्थ्यांची माहिती हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. तब्बल 90 हजारांपेक्षा जास्त विध्यार्थ्यांचे हॉल तिकिट हॅक झाले आहे. एका टेलिग्राम चॅनलवर या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अपलोड करण्यात आले आहेत.
