
कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (23 एप्रिल) सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील साडेसहा तालुक्यातील कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या 112 गावांमध्ये सभा, मेळावा या माध्यमातून प्रचार करण्यात आला आहे. सोशल मीडियाचाही दोन्ही गटाने तितक्याच ताकदीने वापर केला आहे. प्रशासनाकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मतदान केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत कारखान्यासाठी मतदान होणार आहे.
