शहरात ‘ शिवजन्मोत्सव ‘ मोठ्या उत्साहात साजरा

कोल्हापूर : शहरात ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आज शिव – बसव जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथून आज वीरशैव समाजाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी या मिरवणुकीत पुरुषांनी पांढरी वस्त्रे व महिलांनी भगव्या साड्यांसह भगवे फेटे परिधान केले होते.मिरवणुकीत लेझीम व ढोल – ताशांचा गजर करणारे पथक विशेष लक्ष वेधून घेत होते.

मिरवणुकीत सामाजिक ,पर्यावरणीय संदेश देणारे फलकही मोठ्या प्रमाणात झळकत होते. पाणी वाचवा,पृथ्वी वाचवा ,झाडे वाचवा असे फलक यावेळी मोठ्या प्रमाणात दिसत होते. मिरवणुकीत यावेळी ‘ बसवेश्वरांचा विजय असो ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ‘ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.या मिरवणूकीची सुरुवात दसरा चौकातील चित्रदूर्ग मठापासून होऊन सीपीआर मार्गे परत चित्रदुर्ग मठ येथे मिरवणुकीची सांगता झाली.यावेळी या मिरवणुकीत सुनील गाताडे,राजू वाली,राजेश पाटील, कुरुबल माळी यांच्यासह मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते.

🤙 8080365706