
कोल्हापूर: येथील शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने परिवर्तनवादी संत महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन रेशन व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डाॅ. रवींद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ.गुरुदत्त म्हाडगुत होते. यावेळी बोलताना रवींद्र मोरे यांनी तत्वज्ञान, समाजकारण आणि धर्म यासह अनेक विषयांवर महात्मा बसवेश्वर यांनी केलेले महत्त्वपूर्ण कार्याची माहिती दिली. तसेच देशाच्या विकासासाठी बसवेश्वरांचे विचार प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन केले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ गुरुदत्त म्हाडगुत, संचालक अजय पाटील, नाट्य परिषदेचे संचालक शिवकुमार हिरेमठ, राहुल सुलताने,सुचित हिरेमठ, रमेश पाटील, राजेंद्र गोते, बाबा यादव, प्रताप घाटगे,प्रकाश हिरेमठ, जगन्नाथ नाईक, आपत्कालीन जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्यासह परिसरातील नागरीक उपस्थित होते.
