
मुंबई : देशात रोज कोरोना रुग्णांची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये 12 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सरकारसोबतच सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशामध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेले 12,193 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 67,556 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत 42 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशात आतापर्यंत 5,31,300 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या 24 तासांत 10,765 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
