परीक्षेला अवघे १२ दिवस; मुंबई विद्यापीठाने परीक्षेचे अर्जच भरून घेतले नाहीत

मुंबई : मुंबई विद्यापीठाअंतर्गत एलएलबी सत्र सहाच्या परीक्षा ३ मे पासून घेण्यात येणार आहेत. परीक्षेला अवघे 12 दिवस राहिले असतानाही अजून मुंबई विद्यापीठाने परीक्षेचे अर्जच भरून घेतले नाहीत. अर्ज भरुन घेण्यापूर्वीचं विद्यापीठानं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलंय.

मुंबई विद्यापीठ एलएलबी सत्र सहाच्या परीक्षा या 3 मे पासून मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये घेतल्या जाणार आहेत. मात्र अवघ्या बारा दिवसांवर परीक्षा असताना अद्यापही परीक्षा देणाऱ्या अनेक महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेले नाहीत. शिवाय परीक्षा अगदी तोंडावर असताना हॉल तिकीट सुद्धा विद्यार्थ्यांना दिले गेले नाहीत. मात्र, दुसरीकडे या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता विद्यार्थ्यांचे अर्ज कधी भरून घेतले जाणार आणि हॉल तिकीट कधी मिळणार असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.

🤙 8080365706