आदिवासी महिलांविषयी सरकार उदासीन ; सुप्रिया सुळे

मुंबई-बडोदा महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी पालघर पोलिसांनी आदिवासी महिलांना विवस्त्र होईपर्यंत अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना असंवेदनशीलतेचा कळस असून आदिवासी महिलांविषयी सरकार किती उदासीन हे दिसून येतं आहे असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

काही वेळापूर्वी ट्वीट करत याबाबत गंभीर आरोप केला आहे.काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी?“मुंबई-बडोदा महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी पालघर पोलीसांनी आदिवासी महिलांना अक्षरशः विवस्त्र होईपर्यंत अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली.ही घटना असंवेदनशीलतेचा कळस असून आदिवासी आणि महिलांविषयी हे सरकार किती उदासीन आहे हे दर्शविणारी आहे. माझी राज्य सरकारकडे मागणी आहे की, या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास करुन दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी. दुसरे असे की आदिवासी बांधवांचा विरोध असतानाही त्यांच्या जमीनी पोलीसी बळाचा वापर करून अधिग्रहित का केल्या जात आहेत? त्यांचा जगण्याचा आणि राहण्याचा संवैधानिक हक्क कोणत्याही परिस्थितीत डावलला जाता कामा नये ही आमची भूमिका आहे.” असं ट्वीट सुप्रिया सुळेंनी केलं आहे.

🤙 8080365706