बालिंगा येथे महाराजस्व अभियानमध्ये २७६ जणांना लाभ

बालिंगा: ता.करविर येथे तहसीलदार करवीर यांचे वतीने बालिंगा मंडल कार्यालयाच्या अंतर्गत येणारे गावातील नागरिकांना महाराजस्व अभियान राबविण्यात आले .

यामध्ये दुबार रेशन , रेशन कार्ड नाव वाढविणे व नाव कमी करणे,उत्पन्न दाखला, भूमीहिन असल्याचा दाखला, महिला आरक्षण दाखला, ए.कु.प. कमी करणे दाखला, नॉन क्रिमेल दाखला, संजय गांधी निराधार योजना, लक्ष्मी मुक्ती योजना,शेतकरी उत्पन्न दाखला,डोमेसाईल दाखला, श्रावण बाळ निराधार योजना, नविन मतदार नोंदणी इत्यादी सेवा पुरविण्यात आल्यायाचा लाभ.२७६ पेक्षा जास्त नागरीकांना‌ झाला. महादेव तरुण मंडळ बालिंगा यांचे हॉलमध्ये महाराजस्व सेवा पुरविणेचे अभियान आयोजीत करण्यात आलेले होते. या करीता मंडल अधिकारी अनिल काटकर तसेच बालिंगा मंडल मधिल सर्व तलाठी,तसेच कोतवाल, महा ई सेवा केंद्र धारक त्याच बरोबर स्वस्त धान्य दुकानदार तसेच सरपंच सचीन माळी व गावातील पदाधिकारी ही उपस्थितराहिलेमुळे नागरीकांची मोठी सोय झाली. या वेळी उपस्थित नागरीकांची बैठक व्यवस्था व पिण्याचे शुध्द पाणी व अल्पोपहार याची चांगली सोय केली होती त्यामुळेनागरीका मधुन समाधान व्यक्त होत होते.अशी माहिती बालिंगा कोतवाल रघुनाथ कांबळे यांनी दिली.

🤙 8080365706