सीपीआरमध्ये मृत अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय म्हणजेच सीपीआरमध्ये पीएम रुमच्या शेजारी असलेल्या शेडमध्ये मृत अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (दि. २०) सकाळी निदर्शनास आल्यानंतर सीपीआरमध्ये एकच खळबळ उडाली.

मृत अर्भक कोणी आणून टाकले, की सीपीआरमधील कर्मचा-यांच्या दुर्लक्षामुळे कुत्र्यांनी वैद्यकीय कच-यातून ओढून आणले याचा शोध पोलिस आणि सीपीआरमधील अधिका-यांकडून सुरू आहे. सीपीआरमध्ये रोज ३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येतात. प्रसूती विभागातही रुग्णांची मोठी गर्दी असते. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास पीएम रुमच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आणि बाजूच्या रिकाच्या जागेत भटक्या कुत्र्यांकडून मृत अर्भकाचे लचके तोडले जात होते. हा प्रकार काही नागरिकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती सीपीआरमधील कर्मचा-यांना दिली.