अभिनेत्री राणी मुखर्जीची सासू पामेला चोप्रा काळाच्या पडद्याआड

मुंबई: बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता यश चोप्रा यांच्या पत्नी आणि अभिनेत्री राणी मुखर्जीची सासू पामेला चोप्रा यांचं निधन झालं आहे.

पामेला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. पामेला या 85 वर्षांच्या होत्या. त्या गायिका, लेखिका, डिझायनर आणि सह निर्मात्यासुद्धा होत्या. बॉलिवूड अभिनेता उदय चोप्रा आणि निर्माता आदित्य चोप्रा यांच्या आई पामेला यांचं निधन झालं आहे.त्यांच्या अशा अचानक जाण्याने इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. पामेला या अभिनेत्री नसल्या तरी त्या बॉलिवूडमध्ये सक्रिय होत्या. त्यांचे अनेक सेलिब्रेटींसोबत जवळचे संबंध आहेत. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.