टाचदुखीची कारणे काय आणि उपाय

पूर्वी टाचदुखीची समस्या वयाच्या चाळीशीनंतर सुरू व्हायची मात्र आता अगदी लहान वयातील मुलींनाही टाचदुखीचा त्रास उद्भवतो. यामागील कारणे काय आणि त्यावर कोणते उपाय केल्यास आराम मिळू शकतो याविषयी जाणून घेऊयात.

वाढतं वजन आपल्या वजनाचा पूर्ण भार आपल्या शरीरावर येत असतो. त्यामुळे वजन सतत वाढत असेल तर त्यामुळे टाचा दुखू शकतात. यासाठी व्यायाम, आहार यांचा योग्य प्रकारे अवलंब करुन वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. चपला किंवा बूटआपल्या चपलांचा साईज चुकीचा असेल तरी टाचांना त्याचा त्रास होतो. इतकेच नाही तर चपलांचे सोल चांगल्या दर्जाचे नसेल, खूप मोठ्या हिल्स सतत घालत असू तरी पाय आणि टाचा दुखण्याचे प्रमाण वाढते. यासाठी योग्य मापाच्या, चांगल्या दर्जाच्या चपला वापरायला हव्यात. कामाचे स्वरुपसतत उभं राहायचे काम असेल किंवा प्रमाणापेक्षा जास्त चालावे लागत असेल तरी पाय आणि टाचा दुखू शकतात. त्यामुळे आपले कामाचे स्वरुप लक्षात घेऊन त्यानुसार योग्य त्या गोष्टी करणे आवश्यक असते.

उपाय काय?

१. रात्री झोपताना टाचांना बर्फाने शेकणे हा सर्वात सोपा उपाय आहे. यामुळे टाचेच्या आतल्या स्नायूंना आराम मिळून टाचदुखी काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते. टाचांना तेलाने मसाज केल्यासही चांगला आराम मिळू शकतो. त्यामुळे टाचांना नियमितपणे शक्य तेव्हा तेल कोमट करुन मसाज करायला हवा. यासाठी मोहरीचं तेल वापरलं तरी चांगला फायदा होतो.३. गरम पाण्यात मीठ घालून त्यामध्ये टाचा बुडवून ठेवल्यास त्याचाही टाचदुखी कमी होण्यास फायदा होतो. ४. आंबेहळद हा आयुर्वेदातील अतिशय उपयुक्त घटक असून दुखणाऱ्या टाचांना या आंबेहळदीचा लेप लावल्यास त्याचाही चांगला फायदा होतो. ५. आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, खनिजे या सगळ्या गोष्टींचे प्रमाण चांगले असेल यासाठी प्रयत्न करा. रात्रीच्या वेळी हलका आहार घेणे, आंबवलेले किंवा आंबट पदार्थ कमी खाणे हाही चांगला उपाय आहे. .

🤙 8080365706