कात्यायनी मंदिरात मासिक अमावस्या निमित्त 20 एप्रिल 2023 रोजी महाप्रसादाचे आयोजन: वसंतराव जांभळे

बालिंगा: कोल्हापूर पासून अवघ्या 9 कि. मी. अंतरावर असलेली देवतांची देवता, 52 शक्तिपीठ , विश्‍वातील नवदुर्गा पैकी एक दुर्गा श्री कात्यायनी देवी होय. श्री. कात्यायनी मंदिरात ( ता.करवीर ) येथे गुरुवार दिनांक 20 एप्रिल रोजी मासिक अमावस्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 9 वाजता धार्मिक विधी होम हवन कार्यक्रम देवीचे पुजारी राजू गुरव. हे करतील.12 वाजता आरती, दुपारी 12.30 वाजता मासिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे प्रसाद कमिटी अध्यक्ष श्री वसंतराव जांभळे यांनी आवाहन केले आहे.