पन्हाळगड पर्यटनासाठी आलेला कुटुंबातील बालक अपघातात जागीच ठार-तबक उद्यान समोरील घटना

पन्हाळा:भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील दबडे कुटूंबीय पन्हाळगड पर्यटनासाठी आले असता,आईच्या हात सोडून रस्ता ओलांडतान फोर व्हीलर खाली सापडून दोन वर्षांचा बालक जागीच ठार झाला.ही घटना पन्हाळा येथील तबक उद्यान समोर घडली.

पन्हाळागडावर पर्यटनासाठी आलेल्या सहपरीवार दबडे कुटुंब चहा पिण्यासाठी तबक उद्यानासमोर थांबले असता इंद्रनील अरुण दबडे वय वर्ष दोन राहणार खानापूर,तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर. यांने आईचा हात सोडून रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला हि घटना आज बुधवारी दुपारी तीन वाजता घडली.यातील माहितीनुसार, अरुण दबडे आणि त्यांचे कुटुंबीय जोतिबा वरून पन्हाळा पाहण्यासाठी आले असता, सोबत त्यांचे आई-वडील मित्रपरिवार आले होते.सज्जाकोटी पाहण्यासाठी निघाले असता तबक उद्यान समोरील चहाच्या टपरीवर थांबले होते, त्या ठिकाणी दबडे परीवाराचे फोटो काढणे सुरू होते. यादरम्यान इंद्रनील यांने आपल्या आईचा हात सोडून रस्त्याच्या पलीकडे उभे असलेले त्याचे आजोबा यांच्याकडे धाव घेत असताना सज्जाकोटी कडून येणारी एम एच ४५ ए एल ६२०३ ही सुधीर कुमार हांडे राहणार करमाळा यांच्यी चार चाकी गाडी भरधाव येत असताना यावेळी इंद्रनील हा हंडे यांच्या गाडीच्या उजव्या बाजूच्या चाकाखाली आला. त्याचबरोबर गाडीचे मागील चाकही इंद्रनील चा डोक्यावरून गेले यामध्ये तो गंभीर जखमी झाला स्थानिकांच्या मदतीने इंद्रनील याला पन्हाळा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले तथापी पुढील उपचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालय येथे नेण्यात आले यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आले यावेळी दबडे कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.