बाजार समिती साठी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार जाहीर

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती- कोल्हापूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीची निर्मिती झाली असून या आघाडीत दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली 15 उमेदवारांचे पॅनेल जाहीर झाले आहे.

राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी” या पॅनेलची निर्मिती करताना संचालकपदाच्या जागा कमी आणि इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली. विविध घटकांना सामावून घेत सर्वसमावेशक पॅनेल तयार करण्याचा आटोकाट प्रयत्न नेत्यांकडून झाला आहे. “राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीची स्थापना करीत असताना जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळी आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजयदादा मंडलिक, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनयराव कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, मानसिंगराव गायकवाड आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी साकारली आहे.

नेत्यांनी शिक्कामोर्तब केलेले या आघाडी मधील उमेदवार असे आहेत विकास सेवा संस्था मधून ११ उमेदवार असे भरत बाबासो पाटील -भुयेकर रा. भुयेवाडी ता. करवीर,संभाजी आकाराम पाटील- पैलवान रा. कुडित्रे ता. करवीर, शेखर शंकरराव देसाई रा. सोनाळी- गारगोटी ता. भुदरगड, सूर्यकांत रघुनाथ पाटील रा. बाचणी ता. कागल प्रकाश पांडुरंग देसाई रा. देसाईवाडी ता. पन्हाळा, राजाराम तुकाराम चव्हाण रा. येळवण जुगाई ता. शाहूवाडी, बाळासाहेब गणपती पाटील रा. वंदूर ता. कागल महिला प्रतिनिधी 2 सोनाली शरद पाटील रा. अर्जुनवाडा ता. राधानगरी मेघा रामचंद्र देसाई रा. पुष्पनगर ता. भुदरगड इतर मागासवर्ग 1 शंकर दादासो पाटील रा. शिवारे ता. शाहूवाडी भटक्या विमुक्त जाती -जमाती:1 संदीप कृष्णा वरंडेकर रा. दासेवाडी ता. भुदरगड ग्रामपंचायत सदस्य आता मधून 4 सर्वसाधारण खुला शिवाजी महादेव पाटील रा. कसबा तारळे ता. राधानगरी सर्वसाधारण खुला सुयोग सुभाष वाडकर रा. खेबवडे ता. करवीरआर्थिकदृष्ट्या दुर्बल पांडुरंग गणपती काशीद रा. यवलुज ता. पन्हाळा अनुसूचित जाती जमाती: नाना धर्माजी कांबळे रा. साके ता. कागल सदर १५ उमेदवार आज (बुधवार ) यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित आडते व व्यापारी गटातील दोन उमेदवारांची नावे, तसेच हमाल व मापाडी गटातील एक, असे तीन उमेदवार उद्या (गुरुवारी) सकाळी जाहीर करण्यात येणार आहेत.