खारघर प्रकरणात मृत्यूचे आकडे लपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दबाव टाकला ; संजय राऊत

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. खारघर प्रकरणात मृत्यूचे आकडे लपविले जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दबाव टाकला असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

यामध्ये आत्तापर्यन्त 14 जणांचा मृत्यू झाला असला तरी हा आकडा 20 पर्यन्त जाण्याची भीती व्यक्त केली जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. संजय राऊत यांनी खारघर प्रकरणात उष्माघात हे कारण नसून सरकारने केलेले ढिसाळ नियोजन आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये लाखो श्री सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये उष्माघातामुळे आत्तापर्यन्त चौदा जणांचा मृत्यू झाला आहे.

🤙 8080365706