उष्माघाताच्या बाबतीत लक्षात ठेवायलाच हव्यात अशा गोष्टी

चला तर जाणून घेऊयात उष्माघाताच्या बाबतीत लक्षात ठेवायलाच हव्यात अशा गोष्टी.

हायड्रेशन म्हणजे जादू नव्हे,बदलत्या तापमानानुसार-वातावरणानुसार आपल्या जीवनशैलीत यथायोग्य बदल केले पाहिजेत. आऊटडोअर काम करणारे-फिल्ड वर्कर्स-मार्केटिंगवाले या मंडळींनी आपले ‘कूलिंग ब्रेक्स’ ठरवले पाहिजेत. दिवसाच्या कुठल्या वेळी आपण कुठं आणि किती वेळ असणार याचं नियोजन केलं पाहिजे. २. घाम येतोय म्हणजे शरीर उष्णतेसोबत जुळवून घेतंय असंही अनेकांना वाटतं पण कोंदट ठिकाणी-तळघरात-वायूवीजन नसलेल्या ठिकाणी वाढत्या तापमानामुळं घाम आला नाही तरी उष्माघात आपला झटका दाखवू शकतो. हलकी चक्कर-असंमजस स्थिती-गोंधळ-अशक्तपणा-मळमळ-अतीसंवातन अशी काही लक्षणं उष्माघाताचे संकेत असू शकतात..उष्माघातामुळं होणारी गोंधळलेली स्थिती स्वत:पेक्षा समोरच्या व्यक्तीस लवकर लक्ष्यात येते त्यामुळं लवकर निदान व्हायला मदत होते,परिस्थिती लवकर आटोक्यात येते. मात्र ऐन उन्हाळयात नैसर्गिकपणे उष्माघाताचे पेशंट रोजच येतात पण आधीच उन्हाच्या तडाख्यात सापडलेल्या पेशंटला लोकं भर उन्हात दवाखान्यात घेऊन जातात,रस्त्यात पेशंट अधिकच गळपटतो. आधी थोडं पेशंटला सावलीत नेणं-भानावर आणणं-थंडावा देणं-आधार देणं आणि शक्य झालं तर आहे तिथं नर्सिंग केअर आणि मग दवाखान्यात नेणं असा प्राधान्यक्रम हवा..काळजी म्हणून काही जागरुक लोक आधीच ओआरएस किंवा मीठ-साखर-पाणी पितात पण असं प्रिलोड होऊन सगळं आलबेल होतं असं नाही, थकवा आल्यानंतर ते तसंही घाम आणि मुत्रावाटे बाहेर पडतं आणि नंतर खरं तर या पदार्थांची जास्त आवश्यकता असते.

🤙 8080365706