
कोल्हापूर :बाबा रेडकर गो गीता सेवा संस्था काटेभोगांव गोशाळेतील गाईंना चारापाणी, पशुसंवर्धन अर्थसहाय्य व नुकसान भरपाई मिळावी यासाठी 18/ 4 /20 23 इ. रोजी भूदान दिनी संस्थापक अध्यक्ष आबा कांबळे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तहसीलदार पन्हाळा यांचे वतीने बाजारभोगांव सर्कल ऑफिसर खोत साहेब यांनी प्रत्यक्ष उपोषण स्थळी भेट देऊन सरकार हक्कातील गट नंबर 600 या जमिनीमध्ये तुम्हाला गाई चरणेसाठी शासनाकडून कोणताच अडथळा होणार नाही. जळीताच्या प्रश्नावरती सत्वर योग्य ते पत्र व्यवहार करून तो प्रश्न निकालात काढण्यात येईल तसेच पशुसंवर्धन विभागाकडे अर्थसहाय्यासाठी आपल्याकडून दिलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा शासनाकडून केला जाईल असे सांगितले. गाईंना पाण्यासाठी जिल्हाधिकारी रेखावर साहेब यांनी पन्हाळ्याचे बीडिओ श्री सावंत यांना तातडीचा उपाययोजना म्हणून टँकरने पाणी देण्यासंबंधात सूचना केल्या होत्या. त्यांचे कडून 12/4/ 23 पासून फक्त दोन टँकर पाणी देऊन टँकर देण्याचे बंद केले. त्यामुळे आबा कांबळे यांनी जोपर्यंत पूर्ववत दररोज पाण्याचा टँकर नैसर्गिक पाण्याची व्यवस्था होईपर्यंत अथवा कायमस्वरूपी गाईंना पाण्याची व्यवस्था बनेपर्यंत आणि तसे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा निर्णय घेतल्यामुळे बेमुदत उपोषण सुरू राहणार आहे.
यावेळी सर्कल ऑफिसर खोत साहेब, तलाठी महाजन मॅडम, ग्रामसेवक जाधव मॅडम, सुभाष सावंत, रघु खाटांगळेकर, सरपंच रवी पाटील, पोलीस पाटील संभाजी पाटील व पोलीस अधिकारी निकम साहेब व त्यांची टीम ,त्याचबरोबर संस्थेच्या अध्यक्षा सौ आनंदी कांबळे, माजी उपाध्यक्ष सरदार आंग्रे, खजाणीस गणपती पाटील, रमाकांत कांबळे, नामानंद कांबळे,संस्थेच्या सदस्या सौ. मंदाकिनी कांबळे, सुनंदा कांबळे, विनायक साळुंखे, प्रमिला वनकोरे ,भक्ती कांबळे, बापूजी कांबळे उपस्थित होते. सकाळी नऊ वाजलेपासून सर्वधर्म प्रार्थनेने उपोषणाची सुरुवात झाली. गाईंना कायमस्वरूपी पाणी मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा निर्धार केला.
