राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत जमवाजमव सुरू

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुरंदर दौरा रद्द केलेला असतानाच राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत जमवाजमव सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे काही आमदार मुंबईला निघाले आहे. पक्षाची बैठक असल्याचा आमदारांना निरोप मिळाला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात असताना मुंबईत बैठक कशी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. शरद पवारांच्या अपरोक्ष मुंबईत बैठक बोलावण्यात आलीय का अशीही चर्चा सुरु झाली आहे.पिंपरीचे आमदार अण्णा बनसोड हे मुंबईत बैठकीसाठी निघाले आहे. पक्षाच्या बैठकीला सगळे आमदार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. बैठकीला निघण्यापूर्वी त्यांनी गोड बातमीची वाट पाहत असल्याचं सांगितलंय. राष्ट्रवादीचे हे आमदार कोणत्या गोड बातमीच्या प्रतीक्षेत आहेत असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.

🤙 8080365706