राज ठाकरे समर्थकांकडून शेतकरी बांधवांना मोर्चासाठी आमंत्रण…

कोल्हापूर : जिल्ह्यातील पी. एम.किसान योजनेअंतर्गत लाभ न मिळालेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी राज ठाकरे समर्थक यांच्याकडून मोर्चासाठी आमंत्रण करण्यात आले आहे.

आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात व सर्व देशभरातील शेतकरी वर्गाला पि.एम.किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये खात्यात जमा होतात. पण कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकरी वर्गाला या योजनेचा लाभ मिळत नाहीये.यावर आपले शेतकरी असणारे महाराष्ट्र सैनिक यांनी एक बैठक घेत मनसे कोल्हापूर शहराध्यक्ष,नगरसेवक मा.राजू दिंडोर्ले साहेब यांच्यासमोर ही व्यथा मांडली असता त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन देत,शर्थीचे प्रयत्न करत आहेत.पण जबाबदार प्रशासन याची जबाबदारी एकमेकांवर झटकत आहेत.हे लक्ष्यात येताच संबंधित प्रशासनाला १८ तारखेला मोर्चाचा अल्टिमेट दिला तरी देखील प्रशासन अजून ढिम्मच आहे.प्रशासनाला असं वाटते की, जिल्ह्यातील शेतकरी संघटित होणार नाही,आम्हाला कोणी विचारणार नाही.पण शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच जागृत असते.आपण भूमिपुत्र कोल्हापूरचा शेतकऱ्यांचा दणका काय असतो. हे दाखवून देऊ असे आवाहन करण्यात आले आहे.

🤙 8080365706