महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा दणक्यात

नागपूर: सभा होऊ नये म्हणून भाजपने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर मात करत महाविकास आघाडीने दणक्यात वज्रमुठ सभा घेऊन भाजपच्या नागपूर बालेकिल्ल्याला हादरे दिले.

सध्या भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची प्रक्रिया सुरू केली असताना महाराष्ट्रात तीन पक्षाच्या महाविकास आघाडीची वज्रमुठ अधिक घट्ट आहे, असा संदेश या सभेतून गेला.भाजपने शिवसेनेत फूट पाडून महाविकास आघाडी सरकार पाडले. त्या विरोधात लढा देण्यासाठी व भाजपला पर्याय उभा करण्यासाठी महाविकास आघाडीने विभागनिहाय सभा घेण्याचा निर्णय घेतला. त्यातील दुसरी सभा रविवारी भाजपच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नागपूरमध्ये पार पडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा दिग्गज नेत्यांच्या गृहजिल्हात सभा होत असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या सभेकडे होते. त्यामुळेच भाजपने या सभेला थेट विरोध न करता आडमार्गाने विरोध सुरू केला.

🤙 8080365706