बहुजन समाजातील युवकांना यशस्वी उद्योजक बनवणे हेच घाटगे घराण्याचे स्वप्न: राजे समरजितसिंह घाटगे

– कागल येथील ऐतिहासिक गैबी चौकातील नवोद्योगांच्या मेळाव्यात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व सौ नवोदिता घाटगे सत्कार करताना नवउद्योजक .

*पुढील वर्षात आणखी एक हजार हून अधिक युवकांना व्यवसायात आणण्यासाठी प्रयत्नशील

गैबी चौकात राजे बँकेमार्फत नव-उद्योजकांचा मेळावा*

कागल : राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्यभर काम केले.या महान विभूतींचा आदर्श, व स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांचे समाजभिमुख विचार डोळ्यासमोर ठेवून बहुजन समाजातील युवकांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना यशस्वी उद्योजक बनवणे. हेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जनक घराणे म्हणून घाटगे घराण्याचे स्वप्न आहे ,असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

येथील ऐतिहासिक गैबी चौकात राजे बँकेच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या नवऊद्योजक तरुण व त्यांचे कुटुंबीय यांच्या स्नेह मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती व स्व. शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आठव्या स्मृती दिनाचे औचित्य साधून या मेळाव्याचे आयोजन केले होते.

अध्यक्षस्थानी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे होत्या.यावेळी प्रविणसिंहराजे घाटगे, सौ.नंदितादेवी घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, श्रेयादेवी घाटगे, अखिलेशराजे घाटगे, डिक्कीचे प्रसन्न भिसे,बिद्रीचे संचालक बाबासो पाटील,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे,विठ्ठल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री घाटगे पुढे म्हणाले, नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे युवक घडविण्यासाठी राजे बँकेच्या विविध कर्ज योजना तसेच केंद्र राज्य शासन व डीकीच्या माध्यमातून बहुजन समाजातील तरुणांना व्यवसायामध्ये आणण्याची धोरण आम्ही मागील वर्षात निश्चित केले. यामध्ये आम्ही यशस्वी झालो असून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन दिलेयामधून 1172 नवउद्योजक घडले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.पुढील वर्षात आणखी एक हजार हून अधिक युवकांना व्यवसायात आनुन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.आज स्व.राजसाहेब असते तर त्यांनाही या गोष्टीचा मोठा अभिमान वाटला असता. स्थानिक पातळीवर यशस्वी झालेले हे उद्योजक भविष्यात इतरांसाठी ब्रँड अँबेसिडर ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी स्वरुपा सासणे श्री दत्त भेळचे बाबासो घुणके, अनिल पाटील (साके),ओंकार अस्वले(कागल),अभिषेक जाधव (गडहिंग्लज )स्वरुपा कुरणे(कासारी) अनुपमा मोरे (हमिदवाडा ),प्रतिभा पाटील (गडहिंग्लज ),तेजस्वीनी सोनुले(कागल),अजीत कांबळे(व्हन्नूर ),यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी नव- उद्योजकाच्या वतीने राजे समर्जितसिंह घाटगे व नवोदिता घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.स्वागत चेअरमन एम.पी.पाटील यांनी केले. आभार व्हाईस चेअरमन नंदकुमार माळकर यांनी मानले.

चौकट

गैबी चौकातील आगळावेगळा मेळावा* ऐतिहासिक गैबी चौकाने आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या नेत्यांच्या राजकीय सभा झाल्या. परंतु या मेळाव्याच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरील यशस्वी उद्योजक,त्यांचे कुटुंबीय व कर्मचारी यांच्या यशस्वीतेच्या यशोगाथा त्यांच्या शब्दात मांडणारा आगळावेगळा मेळावा झाला. त्यामुळे व्यवसायात करिअर करू इच्छिणाऱ्या अनेक तरुणांना यातून प्रेरणा मिळेल याची चर्चा उपस्थितामध्ये होती.

चौकट 1

व्यवसायासाठी प्रोत्साहन व सर्वतोपरी पाठिंबा याबाबत नवउद्योजकाकडून सौ व श्री घाटगे यांचेप्रती कृतज्ञता* राजे समरजीतसिंह घाटगे व सौ नवोदिता घाटगे वहिनी साहेब, यांनी आम्ही व्यवसायात यावे यासाठी दिलेले प्रोत्साहन व पाठिंबा आमच्यासाठी मोठा होता यामुळेच आम्ही व्यवसायात आलो आणि यशस्वी झालो याचे सर्वश्रेय या उभयतांना जाते अशा कृतज्ञतापूर्ण भावना आपल्या मनोगतून अनेक नव -उद्योजकांनी व्यक्त केल्या.

🤙 8080365706