
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल रोजी भारतसह संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. आयुष्यभर समानतेसाठी संघर्ष करणारे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समानता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जातात.
यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा ‘समानता दिवस‘ आणि ‘ज्ञान दिन‘ म्हणून देखील साजरा केला जातो. बाबासाहेब हे मानवी हक्क चळवळ, राज्यघटनेची निर्मिती, शोषितांचे थोर उद्धारक आणि त्यांच्या प्रकांड विद्वतेसाठी जगभरात ओळखले जातात. त्यांचा आदर करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जन्मस्थान भीम जन्मभूमी (महू), बौद्ध धम्म दीक्षास्थळ दीक्षाभूमी (नागपूर), त्यांचे समाधी स्थळ चैत्यभूमी (मुंबई) आणि इतर अनेक स्थानिक ठिकाणी त्यांचे कोट्यवधी अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.
