उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य ; देवेंद्र फडणवीस

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमात आले होते. त्याच कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचे कसे पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पाहिली आहे त्यांच्या हे लक्षात आलं असेल की उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. त्यांचं सरकार परत येऊ शकणार नाही. मी वकील आहे. मी हे सांगू शकतो की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय हे त्यांना परत आणून बसवणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज बांधणं योग्य राहणार नाही. जी आमची भूमिका आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की निकाल योग्य पद्धतीने लागेल.

🤙 8080365706