शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या संभाजीनगरात आमदाराला जीवे मारण्याची धमकी

छत्रपती संभाजीनगर : राज्यात एकानंतर एक राजकीय नेत्यांना धमक्या मिळत आहेत. आता शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या संभाजीनगरात अशी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांना धमकीचं पत्र आलंय. राज्यातील काही नेत्यांना थेट मोबाइलवर फोन, संदेशाद्वारे धमकी मिळाली.

तर बोरनारे यांच्या नावाने नुकतंच एक निनावी पत्र आलंय. या पत्रातून त्यांना जीवानिशी मारण्याची धमकी मिळाली आहे. संभाजीनगर शिवसेनेत यामुळे खळबळ माजली आहे. आमदार रमेश बोरनारे हे वैजापूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी बंड केल्यानंतर त्यांनीही आधी सूरत आणि नंतर गुवाहटी गाठलं होतं. संभाजीनगरातील वैजापूर मतदार संघावर त्यांची पकड आहे. रमेश बोरनारे यांच्या घरी नुकतंच एक निनावी पत्र आलंय. या पत्राद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बोरनारे यांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती वैजापूर पोलिसांना दिली आहे. वैजापूर पोलिसांकडून सदर पत्र कुणी पाठवलं असेल, याचा तपास सुरु आहे.

🤙 8080365706