
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्य वाघापूर येथील समाजमंदीराचा होणार लोकार्पणगारगोटी प्रतिनिधी, राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील मागासवर्गीय समाजाकरीता समाजमंदीर, अंतर्गत रस्ते, गटर्स, सुशोभिकरण यासह विविध विकास कामांकरीता 11 कोटी 19 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून आज शुक्रवार 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून वाघापूर ता.भुदरगड येथे 40 लाख रुपये खर्चुन बांधलेल्या समाजमंदिराचा लोकार्पण समारंभ तालुक्यातील समाज बांधवांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रका सांगितले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उतुंग कार्यामुळे त्यांचे नाव भारताच्या सीमारेषा ओलांडत जगाच्या नकाशावर झळकले. प्रस्थापीत व्यवस्थेला छेद देत सामाजिक विषमता दुर करुन शोषित, वंचीत, दलित, उपेक्षित समाजाची सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी यासाठी डॉ.बाबासाहेबांनी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी प्रचंड कष्ठातून निर्माण केलेल्या संविधानामुळे साऱ्या समाजाला न्याय देण्याचे काम झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेतून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी 9 कोटी 90 लाख रुपये मंजूर केले आहे. त्याचबरोबर तिन्ही तालुक्यातील तालुक्यांच्या ठिकाणी बौध्दविहार बांधण्यासाठी प्रत्येक 5 कोटी याप्रमाणे 15 कोटी रुपयांची निधी प्रस्तावित केला आहे. यासह भुदरगड तालुक्यातील फसणवाडी येथे मागावर्गीय मुली व मुलांकरीता वसतीगृह बांधण्यासाठी प्रत्येक 23 कोटी 50 लाख या प्रमाणे 47 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावीत केला असल्याचे सांगितले आहे.सदर कार्यक्रमास वाघापूर सरपंच बापुसो आरडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व तालुक्यातील समाज बांधव उपस्थित राहणार असून जास्तीत-जास्त समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
