
कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ सहकार आघाडीचे नेते माजी आमदार अमल महाडिक यांनी वळीवडे आणि चिंचवाड गावांना भेट दिली. यावेळी सभासदांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी बोलताना माजी आमदार अमल महाडिक म्हणाले,जुन्या जाणत्या सभासदारांनी नेहमीच सहकाराला कौल दिला आहे. याही निवडणुकीत तुमचे आशीर्वाद सत्तारूढ सहकार आघाडीच्या पाठीशी राहू द्या. तुम्ही कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही याची खात्री आहे असा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना माजी सरपंच अनिल पंढरे यांनी राजाराम कारखान्याने नेहमीच सभासदाभिमुख कारभार केला आहे. आज जे लोक विरोधकांबरोबर फिरत आहेत त्यांचेही मयत शेअर्स ट्रान्सफर करण्यात आले आहेत.
कारखान्यामध्ये कधीही राजकीय सूडबुद्धीतून कुणालाही अडचणीत आणण्याचे काम झालेले नाही. उलट अडचणीच्या वेळी सभासदांच्या पाठीशी राजाराम कारखाना नेहमीच ठामपणे उभा राहिला आहे. त्यामुळे विरोधकांनी दिशाभूल करू नये.महापूर काळात आमच्या गावातील पुरबाधित ऊसाला प्राधान्याने तोड देऊन शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला आहे. आता या निवडणुकीत सहकार टिकवण्यासाठी सर्व सभासद एक दिलाने सत्तारूढ सहकार आघाडीच्या पाठीशी आहेत अशी ग्वाही अनिल पंढरे यांनी दिली. चिंचवाड गावातील सभासदांची बोलताना अमल महाडिक यांनी विरोधकांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. ज्यांनी स्वतःच्या कारखान्यात सहकाराचा बळी घेतला ते सहकार वाचवायच्या वल्गना करत आहेत असे शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले. सभासदांच्या हक्कासाठी सहकार आघाडीने नेहमीच पुढाकार घेतला आहे. लवकरच 5000 मॅट्रिक टन गाळप क्षमता विस्तारीकरण आणि कोजनरेशनच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना आणखी चांगला दर देण्यासाठी राजाराम कारखाना प्रयत्नशील आहे असे अमल महाडिक यांनी सांगितले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय चौगुले,बाबासो पाटील,ग्रामपंचायत सदस्य उदय पाटील,विक्रम मोहिते,महेश मोरे,सचिन इंगवले, धनाजी शिंदे ,दादाजी पोवार, बाबासो माणगावे, महावीर चौगुले,रावसो पासाण्णा, शिवाजी पोवार, किरण घाटगे, प्रकाश पाटील, दादा पाटील, शितल पाटील, सुदर्शन उपाध्ये, महादेव मोरे,सदाशिव मोरे, विजय बापूसो चौगुले,लक्ष्मण मोरे,शंकर शिपेकर, विजय मोरे,उदय पोवार ,महावीर पारिसा चौगुले, बाळासो नलवडे, रावसाहेब चव्हाण,प्रशांत जाधव,धनाजी जाधव हे सर्व सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
