चंद्रकांत पाटलांनी भान ठेवलं पाहिजे; दीपक केसरकर

मुंबई : .चंद्रकांत पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्याने बोलताना 100 टक्के भान ठेवलं पाहिजे, असा सल्ला शिवसेनेचे नेते (शिंदे गट) दीपक केसरकर यांनी दिला आहे.

बाबरी मशिद विद्ध्वंसावरुन बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी दीपक केसरकर यांनी चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. “राजकारणात स्थान टिकवायचं असेल तर संयमाने बोलावं लागतं,” असंही केसरकर म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल मुख्यमंत्री आणि अमित शाहांनी आधीच नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांचे कान टोचले आहेत. यापुढे बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, असं केसरकर म्हणाले. बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. “मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विहिंप (विश्व हिंदू परिषद) किंवा दुर्गा वाहिनीचे होते,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

🤙 8080365706