
बहिरेश्वर प्रतिनिधी..मौजे म्हारुळ ता करवीर येथील युवक ओंकार बदाम पाटील वय वर्ष 26 यांने सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास विषारी औषध प्राशन केले होते.त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते आज सकाळी 9 च्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली.
सतत हसतमुख, मनमिळाऊ स्वभावामुळे त्याचा मित्र परिवार मोठा होता.त्याच्या अचानक झालेल्या एक्झीटने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले.त्याच्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.सदर घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करणेत आली आहे.
