
कोल्हापूर : विश्वविक्रमवीर संविधान कन्या प्रा.डॉ. अनुप्रिया अमितकुमार गावडे यांना यावर्षीच्या राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
हा भव्य पुरस्कार सोहळा शाहू स्मारक येथे पार पडला. यापूर्वीही अनुप्रियाने 40 हून अधिक प्रादेशिक, राज्यस्तरीय,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले असून ती विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांची ब्रँड अँबेसिडर आहे, तसेच आजीवन सदस्य देखील आहे. त्यासोबत अनेक स्पर्धात्मक परीक्षेतून तिने 50 हून अधिक सुवर्णपदक प्राप्त केले असून, पाच विश्वविक्रम तिच्या नावावर नोंदविले गेले आहेत. संविधानाच्या जाणीव जागृतीचे कार्यक्रम सध्या अनुप्रियाने हाती घेतले असून,या तिच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निर्मिती विचार मंच व संविधान जनजागृती अभियान यांच्यामार्फत हा पुरस्कार तिला प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यासाठी आमदार राजेश आवळे, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते शहाजी कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा.विजया कांबळे,मुंबई,ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीकृष्ण अडसूळ,गोवा, ज्येष्ठ विचारवंत डॉ.अरुण गाडे सातारा, अनिल म्हमाने कवी, लेखक,प्रकाशक डॉ. शोभा चाळके लेखिका व प्रकाशिका,कोल्हापूर,नंदकुमार गोंधळी ज्येष्ठ कार्यकर्ते, अँड.करुणा विमल अध्यक्ष धम्म चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर, मा.सुहास बोधे सिनेमेट्रोग्राफर आदी नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह, मानपत्र व पुस्तके देऊन हा पुरस्कार अनुप्रियाला प्रदान करण्यात आला.
