
मुंबई : नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आलेला आहे. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
यामध्ये त्यांनी इतर पक्षांच्या राष्ट्रीय दर्जाच्या संबंधी कुठलाही भाष्य न करता सौम्य प्रतिक्रिया दिली आहे. गेलेला राष्ट्रीय दर्जा पुन्हा परत मिळून आणू असं म्हटलं आहे. याशिवाय निवडणुका येतात आणि जातात त्यानंतर ही परिस्थिती बदलत असते असेही मत जयंत पाटील यांनी म्हंटलं असून केंद्रीय समिती याबाबत पुढील निर्णय घेणार असल्याचे म्हंटले आहे. जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रीय दर्जा कोणत्या पक्षाकडे राहू शकतो याचे काही निकष आहेत. गेल्या दोन वर्षांपासून याबाबत हेरिंग सुरू होते. त्यात आमची बाजू मांडली होती. परंतु आता निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे.
