गीतम विद्यापीठाच्या माध्यमातून युवा राजकारणी आयोजित संवाद कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंची हजेरी

मुंबई : महाराष्ट्रातील युवा नेते आदित्य ठाकरे आज हैदराबाद दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान आदित्य ठाकरे हे गीतम विद्यापीठाच्या माध्यमातून युवा राजकारणी आयोजित संवाद कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. याशिवाय तेथील विद्यार्थ्यांना संबोधित देखील करणार आहे.

याच दरम्यान आदित्य ठाकरे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचीही भेट घेणार असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आदित्य ठाकरे हे विविध ठिकाणी दौरा करत आहे. मागील सहा महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. विविध भागांमध्ये सभा घेत पक्षाला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्यासाठी आदित्य ठाकरे मैदान गाजवत आहे.

याच दरम्यान गीतम विद्यापीठ आयोजित युवा राजकारणी संवाद कार्यक्रमात आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. खरंतर आदित्य ठाकरे हे हैदराबादमध्ये जाण्यामागील काय कारण असणार याबाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

🤙 8080365706