नवी मुंबई वाशी येथील इस्टेट एजंट सुनिल आर. लालचंदाणी यांना अटक

नवी मुंबई : सन २०१८ मध्ये बावा टॉवर, सेक्टर १७ वाशी, नवी मुंबई येथील तिरूमला इस्टेट कंन्सलटंट या फर्मचे प्रोप्रा. सुनिल आर. लालचंदाणी यांनी फसवणूकीच्या उद्देशान, कोल्हापूर येथील हॉटेल व्यावसायिक विलास महादेव वाघमोडे यांच्या कडून २५ लाख रूपये घेतले होते. सदर रक्कम परत फेडीच्या वेळी पुन्हा फसवणूकीच्या उद्देशाने २५ लाख रूपये रक्कमेचा चेक दिला होता.सदर चेक न वटल्यामुळे न्यायालयात खटला दाखल केला होता.

सदर खटल्यात सुनिल आर. लालचंदाणी हे सतत गैर हजर राहिल्यामुळे त्याच्या विरुध्द मे. न्यायालयाने अजामीनपात्र अधीपत्र जारी केले होते. त्यामुळे सुनिल लालचंदाणी यांना दिनांक ०७/०४/२०२३ रोजी वाशी पोलिसांनी अटक केली होती.

आज दिनांक ०८/०४/२०२३ रोजी सुनिल लालचंदाणी यांना कोल्हापूर येथील न्यायालयात हजर केले.सदरचे काम फिर्यादी तर्फे अॅड. कुणाल व्ही. पाटील व अॅड. शुभम गणेशाचार्य यांनी पाहिले.

🤙 9921334545