
मुंबईः मागील काळात अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने टीकेचे धनी ठरलेल्या राज्य सरकारने आज एक मोठी घोषणा केली आहे. तब्बल १० हजार कोटी रुपायांचा मेगा टेक्स्टाईल प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जात आहे.
याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महाराष्ट्रात मोठा प्रकल्प उभा राहात आहे. अमरावती जिल्ह्यात १० हजार कोटींची गुंतवणूक असलेला मेगा टेक्स्टाईल प्रकल्प उभा राहात आहे. या प्रकल्पामुळे थेट १ लाख रोजगार निर्मिती होईल आणि अप्रत्यक्षपणे ३ लाख लोकांना रोजगार मिळेल. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचं फडणवीस म्हणाले.
