
पुणे : महाराष्ट्र सामाईक परीक्षा विभागाकडून यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी चार अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.शिवाय यंत्रणा सुद्धा अद्यावत करण्याच्या दृष्टिकोनातून सीईटी सेल कडून प्रयत्न करण्यात आले आहेत. सीईटी परीक्षेसंबंधी माहिती अलर्ट मिळवण्यासाठी सीईटी सेलकडून अॅप्लीकेशन सुरू केले जाणार आहे.

शिवाय,विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्हाट्सअप मेसेज सुद्धा सीईटी सेल कडून या परीक्षेसाठी सुरू केले जाणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा नोंदणी सोबतच कॅप राऊंड प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा त्रास वाचणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
