
कसबा बावडा :कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये ‘आय कनेक्ट’ फोरमची स्थापना करण्यात आली.

औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणारे विविध बदल आणि संशोधन याबद्दल मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांना ज्ञान अवगत व्हावे हा या फोरमचा मुख्य उद्देश आहे. ‘आय कनेक्ट’ फोरमच्या माध्यमातून अविसन इंडस्ट्रीचे सीईओ अविनाश चिटणीस, कोहिनूर इंडस्ट्रीचे मालक संजय भगत आणि आर्णी मेक प्रॉडक्ट्स लिमिटेडचे मालक अनिरुद्ध तगारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाची सुरुवात वॉटर इन प्लांटने करण्यात आली.
कार्यक्रमांमध्ये मान्यवरांनी आपला जीवन प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल विभागाच्या औद्योगिक क्षेत्रामधील संधी यावर प्रश्न विचारले. औद्योगिक क्षेत्रातील संशोधन, औद्योगिक क्षेत्रांमध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणीवर कशी मात करता येईल, औद्योगिक क्षेत्रामध्ये लागणारे फंड्स या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले तज्ञांकडून यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. सुनील रायकर, विराज पसारे, उत्कर्ष पाटील यांच्यासह कॉलेजमधील शिक्षक,शिक्षोत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील यांचे सहकार्य लाभले.
