
सांगली: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.सत्तधाऱ्यांनी अधिवेशनात त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाईची मागणी केली. यातच आता राऊतांनी अजून एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी थेट निवडणूक आयोगाला उद्देशून आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला.

संजय राऊतसांगलीच्या दौऱ्यावर होते, यावेळी ते म्हणाले की, ‘मी खूप वर्षांनी सांगलीत आलोय. रस्त्या-रस्त्यावर शिवसैनिकांनी माझे स्वागत केले. सांगलीचे आमदार-खासदार निवडून आले, हे आता परत निवडून येणार का? ५० खोक्यांच्या एवढ्या घोषणा झाल्या की, जगात इतर कुठली गोष्ट इतकी लोकप्रिय झाली नाही. आतापर्यंत आम्ही बघितलं, हे वारे झाले ते वारे झाले. पण ५० खोके एकदम ओके हे अख्ख्या जगात पोहचलंय’, अशी टीका राऊतांनी केली.