कोडोलीतील बिलट्यूब कंपनीच्या वेस्ट पेपर गोडावूनला आग लागून २ कोटींचे नूकसान

कोडोली ता. पन्हाळा येथील बिल्ट्यूब कंपनीच्या वेस्ट पेपर गोडावून ला लागलेली आग विझवताना

वारणानगर / प्रतिनिधी कोडोली- पोखले मार्गावरील बीलट्यूब इंडस्ट्रीज कंपनीच्या असणाऱ्या रॉ मटेरियल गोडावूनला ( वेस्ट पेपर ) आकस्मीक लाग लागून आगीत सर्व वेस्ट पेपर व इतर साहित्य जळून खाक झाले यामध्ये सुमारे २ कोटीं रुपयांचे नूकसान झाले आहे.

शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कोडोली ता.पन्हाळा येथील बिल्ट्यूब इंडस्ट्रीज कंपनीतील रॉ मटेरियल (वेस्ट पेपर ) साठी मोठे गोडावून आहे यामध्ये वेस्ट पेपरसह इतर साहित्य होते दुपारी अचानक गोडावूनमध्ये आग लागल्याने कागदांनी पेट घेतला यामध्ये एक हजार टन वेस्ट पेपर, इतर साहीत्य व पत्रे जळून खाक झाले दरम्यान वारणा कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाडीने आग विझविण्याचा प्रयत्न केला रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न बिलट्यूब कंपनीच्या व्यवस्थापनाकडून सुरू होते.

कंपनीचे प्रशासकीय अधिकारी व एच.आर.विभागाचे प्रमूख पी.एस.पाटील यांनी या घटनेची माहीती कोडोली पोलीसांत दिली असून कोडोली पोलिस ठाण्याचे सपोनि शीतलकुमार डोईजड यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.रात्री उशिरापर्यंत गोडावून मधील आग पूर्णपणे विझविण्याचे काम सुरू होते.

🤙 9921334545