
मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. वातावरणात कमालीचा चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रात उद्यापासून ६ मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर कोकण आणि विदर्भात सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला होता. त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण उन्हाळा सुरु होण्याआधीच पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.