पन्हाळ्यात घराला आग.प्रांपचिक साहित्याचे नुकसान:सुदैवाने जीवितहानी नाही

पन्हाळा येथील बाजीप्रभु पुतळ्यानजीक घराला आग लागल्याने घरातील साहित्याचे झालेले नुकसान.

पन्हाळा : येथील बाजीप्रभू परिसरातील वाहन तळाच्या शेजारी असणाऱ्या शैलजा रवींद्र कदम  यांच्या घराला मोठी आग लागली. शैलजा कदम या घराबाहेर गेल्या असताना ही आग अचानक लागली. घराच्या कौलारू छतामधून आगीचे लोट येताना दिसत होते. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रापंचिक साहित्य मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.

पन्हाळा येथील शैलजा रवींद्र कदम यांच्या राहत्या घऱाला गुरुवारी रात्री ८.३० वाजता लागली. शैलजा ह्या कामानिमित्त घऱाबाहेर गेल्याने आगीचे लोट बाहेर पडू लागल्यानंतर हा प्रकार समोर आला. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, प्रापंचिक साहित्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात घराचे कौलारू छत जळून कोसळले आहे.

आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पन्हाळ नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने ही आग घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. राष्ट्रीय बहुजन महासंघाचे सर्व सदस्यांनी ही आग विजवण्यासाठी मदत केली. आग लागल्यानंतर वार्ता वाऱ्यासारखी पन्हाळा परिसरात समजल्याने या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. सोशल मीडियावर देखील या आगीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे.

🤙 8080365706