
तुळशीच्या झाडाला जास्त काळजी घेण्याची गरज असते कारण हे एक ट्रॉपिकल प्लांट आहे. म्हणूनच तुळशीच्या झाडाला कमी पाणी, कमी ऊन आणि कमी हवा लागते. जर ते झाड सुकलं तर पुन्हा काही उपाय करून हिरवंगार करता येऊ शकतं.

जर घरातलं तुळशीचं झाडं पूर्णपणे सुकलं असेल आणि पुन्हा बहरलेलं दिसावं असं वाटत असेल तर एक सोपा उपाय फायदेशीर ठरू शकतो. कडुलिंबाची पानं सुकवून २ चमचे पावडर तुळशीत घाला. ही पावडर तुळशीत व्यवस्थित एकत्र करून घ्या. असं केल्यानं तुळशीचं झाडं भराभर वाढेल.
ऑक्सिजन गरजेचा पावसाळ्याच्या दिवसात तुळशीच्या झाडात भरपूर पाणी जमा होतं. यामुळे तुळशीच्या झाडाची पानं गळायला सुरूवात होते कारण झाडाला जास्त मॉईश्चर मिळते. यामुळे झाडं व्यवस्थित श्वास घेऊ शकत नाहीत. यामुळे हळूहळून तुळशीची पानं सुकायला लागतात.झाडापासून १५ सेमी अंतरावर माती २० सेमी खोलीपर्यंत खोदली असता, जमिनीत ओलावा असल्याचे दिसून येईल. असे झाल्यास, त्यात कोरडी माती आणि वाळू भरा, ज्यामुळे झाडाची मुळे पुन्हा श्वास घेऊ लागतील.
