
कोल्हापूर : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत घवघवीत यश प्राप्त झाले बद्दल महाविकास आघाडी तर्फे विजयउत्सव साजरा करण्यात आला.

छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून माहविकास आघाडीच्या सर्व नेत्यांकडून, युवक युवती आणि महिला पदाधिकाऱ्यांकडून साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन भाई चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजयराव देवणे व शिवसेना शहराध्यक्ष सुनील मोदी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, संपत पाटील, विक्रम जरत, महम्मद शरीफ शेख, किशोर खानविलकर, डॉक्टर बुलबुले, प्रताप जाधव, ईश्वर परमार, राजू साबळे, मंजीत माने, उदय पोवार, आनंदा करपे, वैशाली महाडिक, लीला धुमाळ, हेमलता माने, चंद्रकला कांबळे, संगीता कवाळे, वैशाली कवाळे, समृद्धी दाभाडे, अश्विनी जाधव, अंजली जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
