
बीड : भारत हा मसाल्यांचा देश म्हणून ओळखला जातो. रोजच्या आहारात मसाल्याचे विविध पदार्थ वापरले जातात. सण, उत्सवात गोडधोड काय असले तर वेलचीचा वापर ठरलेला असतो. पण मसाल्याचे राणी म्हणून ओळखली जाणारी वेलची महागली आहे.

वेलचीचे भाव मागील एक महिन्याच्या काळात सतत वाढत आहेत. प्रति किलो 100 ते 150 रुपये एवढ्या दाराची वाढ झाली आहे. यामुळे मसाल्यांसह विविध मिठाईची टेस्ट बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेलचीचे आरोग्यासाठी फायदेआरोग्याच्या दृष्टीने वेलचीचे विशेष महत्त्व आहे. वेलची खाण्याने शरीरात अनेक फायदे होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. ऍसिडिटी, तणाव ब्लड प्रेशर, बद्धकोष्ठता, युरीन इन्फेक्शन, पचनाचा त्रास, अशा विविध गोष्टींसाठी वेलची उपयुक्त आहे. पण मसाल्याच्या पदार्थातून वेलची गायब होण्याची मार्गावर असल्याने त्याचा धोका आरोग्यालाही निर्माण होऊ शकतो.
